Apple Investment In India: Apple चा भारतावर वाढता विश्वास, iPhone चिप असेंब्लीसाठी देशात तयारी

अ‍ॅपलने भारतात उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास, सीजी सेमीसाठी हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

Apple Investment In India: Apple चा भारतावर वाढता विश्वास, iPhone चिप असेंब्लीसाठी देशात तयारी

अ‍ॅपल (Apple) भारतात आयफोन (iPhone) चे घटक अधिक प्रमाणात स्थानिक पातळीवर तयार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाइम्स (Economic Times) च्या वृत्तानुसार, अ‍ॅपलने भारतातील चिप उत्पादक कंपन्यांशी प्राथमिक चर्चा सुरू केली असून, यामध्ये मुरुगप्पा ग्रुप (Murugappa Group) ची कंपनी सीजी सेमी (CG Semi) यांचा समावेश आहे.

गुजरातमधील सानंद (Sanand) येथे सीजी सेमीकडून OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Test) सुविधा उभारली जात आहे. या संभाव्य सहकार्यामुळे अ‍ॅपलच्या पुरवठा साखळीला (Supply Chain) अधिक मूल्यवर्धन मिळणार आहे. अहवालानुसार, अ‍ॅपल प्रथमच भारतात काही विशिष्ट चिप्सचे असेंबलिंग आणि पॅकेजिंग (Assembly and Packaging) करण्याचा विचार करत आहे. सध्या या चर्चा अतिशय प्राथमिक टप्प्यात असून, सुरुवातीला डिस्प्ले चिप्स (Display Chips) भारतात पॅक केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: Elon Musk: एलॉन मस्क नंबर वन! संपत्तीने ओलांडला 600 अब्ज डॉलरचा टप्पा, जगातले टॉप पाच श्रीमंत कोण?

सूत्रांच्या माहितीनुसार, सानंद येथील प्रकल्पातून नेमक्या कोणत्या प्रकारच्या चिप्स तयार केल्या जातील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अ‍ॅपलने भारतात उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास, सीजी सेमीसाठी हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. अ‍ॅपल सध्या पुरवठा साखळीतील विविध कामांसाठी अनेक कंपन्यांशी चर्चा करत असून, त्यापैकी मोजक्याच कंपन्या अंतिम पुरवठादारांच्या यादीत स्थान मिळवू शकतील, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा नुकतेच टाटा इलेक्ट्रॉनिक्स (Tata Electronics) आणि इंटेल (Intel) यांच्यात भारतात सेमीकंडक्टर उत्पादन आणि असेंब्लीसाठी महत्त्वाचा करार झाला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही कंपन्यांनी स्थानिक बाजारासाठी (Local Market) सेमीकंडक्टर उत्पादन, पॅकेजिंग आणि असेंब्लीच्या शक्यता तपासण्याचे मान्य केले आहे.

सामंजस्य करारा नुसार (MoU, Memorandum of Understanding), टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या आगामी Fab आणि OSAT सुविधांमध्ये इंटेलच्या उत्पादनांचे मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग करण्यावर चर्चा होणार आहे. तसेच भारतात Advanced Packaging तंत्रज्ञानावर सहकार्य करण्याचाही विचार केला जात आहे. याशिवाय, इंटेल आणि टाटा ग्रुप भारतात AI PC सोल्यूशन्स (Artificial Intelligence Personal Computers) वेगाने विकसित करण्याच्या संधीही तपासत आहेत. भारत 2030 पर्यंत जागतिक स्तरावर टॉप पाच देशांपैकी एक ठरण्याची शक्यता असल्याने, हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. एकूणच, अ‍ॅपल, टाटा आणि इंटेलसारख्या जागतिक कंपन्यांच्या हालचालींमुळे भारताचा सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातला वाटा लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.

हेही वाचा: Insurance Act Amendment Bill 2025 : विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number