Anupam Kher on CJP Protest: CJP आंदोलनावर अनुपम खेर यांची भूमिका; विद्यार्थ्यांना पाठिंबा देतानाच राजकीय हस्तक्षेपाबाबत व्यक्त केली चिंता

दिल्लीतील CJP आंदोलनावर अभिनेते अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. मात्र आंदोलनात राजकीय अजेंडा घेऊन सहभागी होणाऱ्या घटकांपासून सावध राहण्याचा स्पष्ट सल्लाही त्यांनी दिला.

Anupam Kher on CJP Protest: CJP आंदोलनावर अनुपम खेर यांची भूमिका; विद्यार्थ्यांना पाठिंबा देतानाच राजकीय हस्तक्षेपाबाबत व्यक्त केली चिंता

दिल्लीतील CJP आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून देशभरात चर्चा सुरू आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनांनंतर अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी आपापली भूमिका मांडली आहे. आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याचवेळी आंदोलनात बाहेरील राजकीय हस्तक्षेपाबाबत त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओद्वारे अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आंदोलन करणाऱ्या तरुणांचा आवाज हा समाजाचा आणि देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आवाज आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे आणि त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Aditya Thackeray : क्रूर दडपशाही आणि विद्यार्थ्यांच्या अटकेच्या विरोधात निषेध मोर्चा; 'वन नेशन, वन इमोशन'च्या अंतर्गत आदित्य ठाकरेंनी केले आंदोलनाचे आयोजन

अनुपम खेर यांनी स्वतःच्या विद्यार्थी जीवनाचा उल्लेख करत, प्रश्न विचारणे आणि व्यवस्थेकडे उत्तरांची अपेक्षा ठेवणे ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थता, अपेक्षा आणि भविष्यासंदर्भातील चिंता समजून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, त्यांनी आंदोलनाच्या स्वरूपाबाबत एक महत्त्वाची सूचना दिली. त्यांच्या मते, कोणत्याही विद्यार्थी चळवळीत बाहेरील व्यक्ती किंवा गट स्वतःचा राजकीय अजेंडा घेऊन सहभागी होऊ लागले, तर मूळ आंदोलनाची दिशा बदलण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा घटकांपासून सावध राहावे आणि आपल्या आंदोलनाचा उद्देश कायम ठेवावा, असा संदेश त्यांनी दिला.

त्यांनी असेही म्हटले की, आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याने ताकद वाढल्यासारखे वाटू शकते. मात्र, प्रत्येक सहभागी व्यक्ती आंदोलनाच्या हितासाठीच काम करत असेल असे नाही. काही जण स्वतःचे राजकीय किंवा वैयक्तिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा चळवळींचा वापर करू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Preity Zinta Tweet: 'विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे, पण देशविरोधी…'; प्रीती झिंटाने व्यक्त केली मोठी चिंता, पोस्ट व्हायरल

दरम्यान, CJP आंदोलनावर इतर बॉलिवूड कलाकारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले, तर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तरुण पिढी आता थेट उत्तरांची अपेक्षा करत असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले.

दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनामुळे शिक्षण, परीक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर देशभरात व्यापक चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, आंदोलनाचा पुढील टप्पा आणि सरकारची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number