भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या एटीएसच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह भारतीय हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. निखील शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. निखील शेंडे हे बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत.
निखिल शेंडे यांचा याबाबतीत एटीएसने जबाब नोंद केला असून एअर फोर्सकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी यंत्रणा कुरुलकरच्या माध्यमातून इतर अधिकाऱ्यांनादेखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न झाले का, इतर कोणते अधिकारी या कटात अडकले, याचाही तपास सुरू आहे.