Coronavirus: कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं! 12 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू; आरोग्य विभाग सतर्क

आंध्र प्रदेशात 26 जून ते 16 जुलैदरम्यान 12 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus: कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं! 12 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू; आरोग्य विभाग सतर्क

देशात कोविड-19 ची प्रकरणे कमी झाली असली, तरी काही भागांमध्ये पुन्हा संसर्गाची नोंद होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशात 26 जून ते 16 जुलै या कालावधीत 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या चारही रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या आजारांसारखे गंभीर सहव्याधी (Comorbidities) होते. त्यामुळे त्यांची प्रकृती आधीपासूनच नाजूक होती.

राज्यातील नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक आठ रुग्ण कडप्पा जिल्ह्यात आढळले आहेत. याशिवाय गुंटूरमध्ये दोन, तर विशाखापट्टणम आणि काकीनाडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.सध्या तीन रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत, दोन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तीन जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांबाबत आरोग्य विभाग आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया राबवत आहे.तज्ज्ञांच्या मते, सध्या आढळलेली प्रकरणे वेगवेगळ्या भागांतील आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्थानिक समूह संसर्ग (Cluster Outbreak) दिसून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसली, तरी निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number