Fire In Firecracker Factory At Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील कोटावुरुतला मंडळातील कैलासपट्टिनम येथे एक मोठा अपघात झाला आहे. येथील एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे की, ‘अनकापल्ले जिल्ह्यातील कोटावुरुतला येथील फटाके उत्पादन युनिटमध्ये झालेल्या स्फोटात कामगारांचा मृत्यू दुःखद आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती चिंता निर्माण करणारी आहे. मी जिल्हाधिकारी, एसपी आणि गृहमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश मी दिले आहेत. आग लागली तेव्हा कारखान्यात किती कामगार होते आणि आता त्यांची स्थिती कशी आहे याची मी चौकशी केली. आम्ही पीडित कुटुंबांना मदत करू. मी तुम्हाला धाडसी राहण्याचा आग्रह करतो. मी घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत,’ असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – Kavach 5.0 लाँचसाठी सज्ज! आता मेट्रो-लोकल ट्रेनने प्रवास करणं होणार अधिक सुरक्षित
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जखमी कामगारांपैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. तथापी, एसपी तुहिन सिन्हा म्हणाले की, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चंद्राबाबू नायडू यांनीही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
Eight workers, including two women died and 7 injured, after an explosion at a fireworks manufacturing unit in the Kotavuratla mandal of Anakapalli district, Andhra Pradesh, said police.#Kotavuratla #Explosion #Anakapalli #FireAccident #Visakhapatnam #AndhraPradesh #Anakapalle pic.twitter.com/McIJHAPcXK — Surya Reddy (@jsuryareddy) April 13, 2025
हेही वाचा – मुर्शिदाबादमधील हिंसाचारावर पोलिसांनी मोठी कारवाई! 110 दंगलखोरांना अटक
प्राप्त माहितीनुसार, ही घटना दुपारी 12:45 च्या सुमारास घडली. अधिकारी सध्या मृतदेह बाहेर काढण्यावर आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. स्थानिक लोकही घटनास्थळी पोलिसांना मदत करत आहेत. वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी देखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि सरकारला पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले.