वैदिक धर्माचे पुनरुत्थान करणारा संन्यासी योद्धा

सातव्या शतकात हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारे आणि हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांची आज जयंती. वेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणारे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ मानले जाणाऱ्या आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा. केरळमधील मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या कालडी गावात इ.स. ७८८ मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना त्यांच्या […]

वैदिक धर्माचे पुनरुत्थान करणारा संन्यासी योद्धा

सातव्या शतकात हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारे आणि हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांची आज जयंती. वेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणारे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ मानले जाणाऱ्या आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा.

केरळमधील मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या कालडी गावात इ.स. ७८८ मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना त्यांच्या मातेने केली. शंकराचार्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले व त्यांनतर संन्यास घेण्यासाठी ते घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी सर्व शास्त्रात प्रावीण्य प्राप्त करून मग त्यांनी कशी येथे प्रस्थान केले.

काशीच्या पंडितांशी धर्मचर्चेवर वाद-प्रतिवाद जिंकल्यानंतर त्यांची महती वाढली आणि त्यानंतर आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.आद्य शंकराचार्यांनी दोन ते तीन वेळा संपूर्ण भारत पालथा घातला,अश्या दंतकथा आहेत. आपल्या भारत भ्रमणात त्यांनी मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली. त्यानंतर त्या ठिकाणी गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा चार दिशांना चार पीठांची स्थापना करून आपल्या शिष्यांना पीठाधिपती म्हणून नेमले.
त्या काळात आद्य शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवद्गीता आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत.विशेष म्हणजे आद्य शंकराचार्यांनी आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच आजही चारही धर्मपीठांची कामे सुरळीतपणे सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number