Donald Trump New Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा 100 टक्के टॅरिफ बॉम्ब ; औषध उत्पादनांवर थेट परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला मोठा धक्का दिला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Donald Trump New Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा 100 टक्के टॅरिफ बॉम्ब ; औषध उत्पादनांवर थेट परिणाम

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला मोठा धक्का दिला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांवर होणार आहे. 

ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या टॅरिफनुसार, 'औषध उत्पादनांवर तब्बल 100% कर लावला जाणार आहे. यासह, स्वयपांकघरातील कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीजवर 50%, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30% आणि जड ट्रकवर 25% टॅरिफ लावण्यात येणार आहे. तसेच, 1 ऑक्टोबर 2025 पासून आम्ही कोणत्याही ब्रॅंडेड किंवा पेटंट केलेल्या औषधाच्या उत्पादनावर 100% टॅरिफ लावणार आहोत. जर एखादी कंपनी अमेरिकेत उत्पादन करत असतील, तरंच त्यांना टॅरिफमधून सवलत मिळेल. याशिवाय, 1 ऑक्टोबर 2025 पासून परदेशी जड ट्रकच्या आयातीवर थेट बंदी घालण्यात येणार आहे'. 

भारतामधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात केली जाते. अशातच, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या टॅरिफमुळे भारतीय औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. 100% टॅरिफमुळे अनेक कंपन्यांचे खर्च प्रचंड वाढतील आणि त्यांचा अमेरिकन बाजारपेठेत टिकाव लागणे अवघड होईल. त्यामुळे, भारतातील औषध उद्योगाला या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे. 

हेही वाचा: OMG! 'या' कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिला iPhone 17 Pro Max; कोण आहे आयफोन देणारा 'जगातील सर्वोत्तम बॉस'

'या' कारणामुळे डोनाल्ड ड्रम्प यांनी घेतला टॅरिफ वाढवण्याचा निर्णय

'परदेशी कंपन्यांमुळे अमेरिकेतील स्थानिक कंपन्यांचे नुकसान होत आहे. यासह, परदेशी ट्रक कंपन्या अमेरिकेतील कंपन्यांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे, अमेरिकन कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जर एखादी कंपनी अमेरिकेत उत्पादन करत असेल, तरंच त्यांना टॅरिफमधून सवलत मिळेल', अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे, जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली असून 1 ऑक्टोबरपासून भारतासह जगभरातील कंपन्यांसाठी मोठ्या आव्हानाची सुरुवात होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number