आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला

शरद पवार यांच्याबाबत संजय राऊत यांनी दिलेला सल्ला तुम्ही मानणार का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर खोचक उत्तर दिलंय. मला हा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर तो मी मानला असता, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, यावरून राजकीय […]

आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला

शरद पवार यांच्याबाबत संजय राऊत यांनी दिलेला सल्ला तुम्ही मानणार का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर खोचक उत्तर दिलंय. मला हा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर तो मी मानला असता, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, यावरून राजकीय चर्चा सुरु आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्य करणं आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये प्रतिक्रिया दिली होती.

प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेताना जपून शब्द वापरायला हवेत, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्र काम करायचे आहे. त्यामुळं भूतकाळातील मतभेद आपल्याला दूर ठेवायला हवेत आणि भक्कम आघाडी उभा राहायला हवी असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

शरद पवार हे भाजपचेच आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलं, त्यावर त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. मी जुना इतिहास सांगताना ते वक्तव्य केलं होतं. आताचे संदर्भ वेगळे आहेत. कुणी त्याचा आताच्या संदर्भाने अर्थ लावला असेल तर मी काही करू शकत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number