Andhra Pradesh Bus Accident : भयंकर! चित्तूरहून निघालेल्या यात्रेकरूंवर काळाचा घाला; बस अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळून किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Andhra Pradesh Bus Accident : भयंकर! चित्तूरहून निघालेल्या यात्रेकरूंवर काळाचा घाला; बस अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

आंध्र प्रदेश: अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील चिंतूर-मारेदुमिल्ली घाटरस्त्यावर गुरुवारी उशिरा रात्री भीषण अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्सची बस खोल दरीत कोसळून किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज मध्यरात्री घडली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये चित्तूर जिल्ह्यातील 37 यात्रेकरू, त्यात दोन चालकांचा समावेश होता. त्यांनी भद्राचलम दर्शन घेतल्यानंतर अन्नवरमकडे जात असताना 9th Milestone तुलसीपाका परिसरात हा अपघात घडला. चालकाने तीव्र वळणावर नियंत्रण गमावल्यामुळे बस सुरक्षा भिंतीवर आदळली आणि दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा: Shivraj Patil: भारतीय संसदेत अमीट ठसा उमटवणारे शिवराज पाटील चाकूरकर काळाच्या पडद्याआड

अपघाताचे ठिकाण डोंगराळ आणि मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात असल्याने माहिती पोहोचण्यास वेळ लागला. त्यामुळे मदत कार्य उशिरा सुरू झाले. घटना कळताच मोठुगुंटा येथील प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरेने चिंतूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाने आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथके बचाव आणि शोधकार्य सुरूच ठेवत आहेत. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींच्या उपचारात कोणतीही तडजोड होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Samruddhi Mahamarg Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number