Alia Bhatt in Tumbad 2: ‘हस्तर’च्या रहस्यमय विश्वात आलिया भट्टची एन्ट्री; ‘तुंबाड 2’च्या मेकर्सने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज; रिलीज डेटही जाहीर

सुप्रसिद्ध अभिनेती आलिया भट्ट हिच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलियाची एन्ट्री 'तुंबाड 2' मध्ये होणार आहे. 

Alia Bhatt in Tumbad 2: ‘हस्तर’च्या रहस्यमय विश्वात आलिया भट्टची एन्ट्री; ‘तुंबाड 2’च्या मेकर्सने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज; रिलीज डेटही जाहीर

कलाविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमधील नवीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशातच सुप्रसिद्ध अभिनेती आलिया भट्ट हिच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलियाची एन्ट्री ‘तुंबाड 2’ मध्ये होणार आहे. 

हेही वाचा- Bollywood News: ‘मर्यादेत राहा!’ म्हणत बॉलिवूड अभिनेत्री पापाराझींवर संतापली; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यासंबंधित अधिकृ माहिती ‘तुंबाड 2’ निर्माते सोहम शाह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीच्या बहुचर्चित एन्ट्रीनंतर आता ‘तुंबाड 2’मध्ये आलिया भट्ट अधिकृतपणे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलिया भट्टने आतापर्यंत अनेक जॉनरच्या चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

नुकताच रिलीज झालेल्या ‘अल्फा’या चित्रपटातून आलियाचा ॲक्शन मोड देखील पाहायला मिळाला यानंतर आता ती हॉरर-थ्रिलर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तुंबाड 2’ 3 डिसेंबर 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर अभिनेता आणि निर्माते सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत आलिया भट्टच्या सहभागामुळे ‘तुंबाड 2’मध्ये एक वेगळीच रंगत निर्माण होणार आहे. दरम्यान, नवाझुद्दीन सिद्दीकी नेमकी कोणती भूमिका साकारणार? आलिया भट्ट या सिनेमात कोणत्या भूमिकेत झळकणार, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number