Akshay Kumar Reveals: अभिनेता अक्षय कुमार याने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. गृह विभागाकडून महाराष्ट्रात ‘सायबर जागरूकता महिना’ साजरा केला जात आहे. सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, अभिनेता अक्षयकुमार व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळीच अक्षय कुमारने मुलीला न्यूड फोटोची मागणी केल्याचा अनुभव सांगितला.
अनेक गोष्टी लिहून आणल्या होत्या पण माझ्याआधी अनेक जण बोलले आहेत त्यामुळे मला बोलायला काहीच उरलं नाही असे अक्षय कुमार कार्यक्रमात बोलताना म्हणाला. पुढे बोलताना, माझ्या मुलीसोबत घडलेली घटना सांगायची आहे. मुलगी एक आॅनलाइन गेम मोबाइलवर खेळत होती. त्यानंतर मॅसेजेस येत होते धन्यवाद, मस्त, चांगले खेळलात वैगरे. एक मॅसेज आला तुम्ही कुठून आहात? त्यानंतर आणखी एक मेसेज आला पुरुष आहात की महिला? पुढे मॅसेज आला न्यूड फोटो पाठवा. तिने फोन बंद केला आणि तिच्या आईला सांगितले. अशा घटनांमधूनच ह्या सर्व गोष्टी सुरु होतात. येथूनच सायबर क्राइमची सुरुवात होते. अनेक गोष्टी आणि केसेस तुम्ही स्वतः बघता असे अक्षय कुमारने म्हटले आहे.
मुख्यमंत्री इथे बसले आहेत. शाळेत इतिहास, भूगोल, गणित शिकतो. परंतु, सायबर क्षेत्रात जातो तेव्हा काहीच माहिती नसते. माझी विनंती आहे, शाळांमध्ये सातवी ते दहावी एक तास सायबर क्षेत्राचा असावा. स्ट्रीट क्राइमपेक्षा सायबर क्राइम वाढलं असल्याचे अक्षय कुमारने सांगितले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
सायबर गुन्हा रिव्हर्स करु शकत नाही. अशात जनजागृती महत्त्वाची आहे. आपण सायबर गुन्हे प्रिव्हेंट करु शकतो. मी युट्यूब ब्राऊज करत होतो, माझं भाषण मी उघडलं. बोलत मी होतो, पण शब्द माझे नव्हते. मी डॉ. शेट्टीचं औषध वापरलं, तुम्ही देखील वापरा, चांगलं आहे असं. माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण दाखवलं जात होतं. लोकांना वाटतं होतं मीच ते खरं रेकमेंट करतोय, मात्र तसं नव्हतं असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. डिजिटल अरेस्ट संदर्भात आपण अव्हेअरनेट तयार करत आहोत. तरीही रोज एक केस आपल्याकडे येत आहे. चांगल्यातले चांगले लोकं, निवृत्त लष्कर अधिकारी देखील यात अडकलेले बघितले. अशात हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आता परिस्थिती अशी आहे की माझ्या फोननंबरवरुन अक्षयला फोन जाऊ शकतो आणि निमंत्रण दिलं जाऊ शकतो अमुक कार्यक्रमाला या. आणि त्यांना कळणार देखील नाही की मी तो नव्हतो असे मार्गदर्शनपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी म्हटले.