Akshay Kumar : ती बुडत होती… तिला वाचवायला अक्षय कुमारने स्वतःचा जीव धोक्यात घातला, कोण आहे ती?

बॉलिवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अ‍ॅक्शन सीन्स आणि स्टंटसाठी ओळखला जातो. अक्षय कुमारने एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एका अभिनेत्रीचा डीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.

Akshay Kumar : ती बुडत होती… तिला वाचवायला अक्षय कुमारने स्वतःचा जीव धोक्यात घातला, कोण आहे ती?

बॉलिवूडचा स्टार अभिनेता म्हणजे अक्षय कुमार हा त्याच्या अ‍ॅक्शन सीन्स आणि स्टंटसाठी ओळखला जातो. अक्षय कुमार त्याच्या चित्रपटातील स्टंट स्वतःच करतो हा खुलासा त्याने स्वतः केला होता. अक्षय कुमार केवळ चित्रपटात खिलाडी नसून तो रिअर लाईफमध्येही एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. अक्षय कुमारने एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एका अभिनेत्रीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. ज्या अभिनेत्रीचा अक्षय कुमारने जीव वाचवला तिने वयाच्या 22 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताबही जिंकला आहे.

एवढच नव्हे तर तिने चित्रपटसृष्टीतील पहिले पदार्पण देखील अक्षय कुमारसोबत केले होते. ती अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता, 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या "अंदाज" चित्रपटातील "रब्बा इश्क ना होवे" या गाण्याच्या शुटिंगदरम्यान लारा एका अपघातात अडकली होती. तिने स्पष्ट केले की शूटिंग संपल्यानंतर ती जवळच्या समुद्रात वेळ घालवायला गेली होती.

त्यावेळेस समुद्रात डुबकी मारताना एक जोरदार प्रवाहासह मोठी लाट तिच्या दिशेने आली, ती लाट एवढी जोरात आली की लारा दत्ता त्या लाटेसह वाहून गेली. तिच्यासोबत समुद्राकिनारी उपस्थित असलेल्या अक्षयने तिला वाहत जाताना पाहिले आणि तो कसला ही विचार न करता तिला वाचवण्यासाठी समुद्राच्या दिशेने गेला, आणि त्याने लारा दत्ताचे प्राण वाचवले. त्यावेळेस अक्षय कुमारने हे सिद्ध केले की तो फक्त रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. त्यावेळेस जर अक्षय तिथे उपस्थित नसतात तर कदाचित लारा दत्ता लाटांच्या प्रवाहात वाहून गेली असती, मात्र अक्षय कुमार तिच्यासाठी देवदूत बनुन आला. 

2000मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी सुष्मिता सेननंतर लारा दत्ता ही मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी दुसरी भारतीय आहे. अंदाज व्यतिरिक्त लारा दत्ता आणि अक्षय कुमारने भागम-भाग, हाऊसफुल, इंसान, बेल बॉटम यांसारख्या चित्रपटात सोबत काम केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number