अखिलेश यादव आणि आझम खान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव यांनी आजमगढ लोकसभा मतदारसंघातून आणि सध्या तुरुंगात असलेले सपाचे नेते आझम खान यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आणि आजम खान हे रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना खासदारकीचा […]

अखिलेश यादव आणि आझम खान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव यांनी आजमगढ लोकसभा मतदारसंघातून आणि सध्या तुरुंगात असलेले सपाचे नेते आझम खान यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आणि आजम खान हे रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार होता.

अखिलेश यादव आणि आजम खान यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर आता समाजवादी पक्षाच्या खासदारांची संख्या ५ वरून ३ झाली आहे. तसेच दोन्ही जागा रिक्त झाल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number