Airfare Rise : मोठी बातमी! विमानप्रवासाच्या खर्चात 35 टक्क्यांपर्यंत वाढ, आता दर किती असणार?

गेल्या काही दिवसांत देशातील जवळपास प्रत्येक प्रमुख मार्गावरील विमान तिकिटे 30-35 टक्क्यांनी महाग झाली आहेत.

Airfare Rise : मोठी बातमी! विमानप्रवासाच्या खर्चात 35 टक्क्यांपर्यंत वाढ, आता दर किती असणार?

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील सध्याच्या युद्धसदृश परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्य भारतीय प्रवाशाच्या खिशावर होत आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या (एटीएफ) किमती वाढल्या आहेत आणि विमान कंपन्यांनी इंधन अधिभार लावला असून, त्याचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत देशातील जवळपास प्रत्येक प्रमुख मार्गावरील विमान तिकिटे 30-35 टक्क्यांनी महाग झाली आहेत.

अलीकडेच, देशांतर्गत विमान कंपन्यांच्या एटीएफ शुल्कात 8.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एटीएफ हा विमान कंपनीच्या एकूण परिचालन खर्चाच्या 35 ते 45 टक्के असतो, त्यामुळे इंधनाच्या किमती वाढल्या की तिकिटांच्या किमतीही थेट वाढतात. 16 एप्रिलच्या विमान तिकिटांच्या बुकिंगनुसार, दिल्ली ते गोवा सर्वात स्वस्त थेट तिकीट सध्या 8,384 रुपयेपासून सुरू होते. याच मार्गावर इंडिगोमध्ये 9,038 रूपये ते 11,098 रुपये दरम्यान तिकीट उपलब्ध आहे. काही आठवड्यांपूर्वी, हेच तिकीट 4,500 रूपये ते 6,000 रूपयांमध्ये उपलब्ध होते आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीसाठी बुकिंग केल्यास, दर 15,000 रूपयांपर्यंत पोहोचू शकतो. दिल्ली ते बंगळूरुची परिस्थिती तर आणखीच वाईट आहे. 16 एप्रिल रोजी तिकीट दर 12,596 रूपयांपर्यंत पोहोचला होता, तर दुसऱ्या दिवसाचा दर 15000 ते 17,000 रुपयांपर्यंत होता.

हेही वाचा – Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला 'धुरंधर'ची भुरळ; अक्षय खन्नाच्या गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडीओ 

इंडिगोने 2 एप्रिलपासून नवीन अधिभार रचना लागू केली आहे. देशांतर्गत मार्गांवर अंतरावर अवलंबून 575 रुपये ते 950 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल. एअर इंडिया आणि अकासा एअरनेही असेच अधिभार लागू केले आहेत: दिल्ली ते लखनौ सारख्या लहान मार्गांवर 275 रुपये, मुंबई-कोलकाता मार्गावर 600  रुपये, बंगळूर-हैदराबाद मार्गावर 800 रुपये आणि चेन्नई मार्गावर 950 रुपये आकारले जात आहेत. 

हेही वाचा – Slowest Train In India : ही आहे भारतातली सर्वात छोटी आणि हळू धावणारी झुकझुक गाडी; 16 बोगदे आणि 250 हून जास्त पूल पार करते.. 

आंतरराष्ट्रीय विमानसेवांना कोणताही दिलासा नाही. आखाती आणि मध्य पूर्वेकडील मार्गांसाठी इंधन अधिभार 3000 ते 5000 पर्यंत, तर युरोप आणि यूकेसाठी 10,000 रुपयांपर्यंत आहे. जोपर्यंत इराणमधील संकट निवळत नाही आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सामान्य होत नाही, तोपर्यंत विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही. सरकारने देशांतर्गत विमान कंपन्यांना अंशतः दिलासा दिला आहे, जेणेकरून एटीएफचा (ATF) संपूर्ण भार प्रवाशांवर टाकला जाणार नाही. तथापि, आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी असा कोणताही दिलासा नाही. सध्या तरी, आपली तिकिटे जेवढ्या लवकर बुक कराल, तेवढे चांगले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number