Air India Flight Incident : हवेतच हादरलं विमान, काही सेकंदांतच 300 फूट खाली आलं अन्…; 134 प्रवाशांपैकी 10 प्रवासी…

एअर इंडियाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली आहे. विमानात एकूण 134 प्रवासी प्रवास करत होते.

Air India Flight Incident : हवेतच हादरलं विमान, काही सेकंदांतच  300 फूट खाली आलं अन्…; 134 प्रवाशांपैकी 10 प्रवासी…

थायलंडमधील फुकेटहून दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात हवेतच थरारक घटना घडली. उड्डाणादरम्यान अचानक आलेल्या तीव्र टर्ब्युलन्समुळे विमान काही क्षणांत तब्बल 300 फूट खाली आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत 10 प्रवासी आणि 4 केबिन क्रू सदस्य जखमी झाले असून, एअर इंडियाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली आहे. विमानात एकूण 134 प्रवासी प्रवास करत होते.

माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे AI2379 (नोंदणी क्रमांक VT-EXO) हे विमान फुकेटहून दिल्लीकडे रवाना झाले होते. सुरुवातीला प्रवास सुरळीत सुरू असताना अचानक वातावरणातील तीव्र अपड्राफ्ट (Updraft) आणि डाऊनड्राफ्ट (Downdraft)मुळे विमानाला जोरदार धक्के बसले. यामुळे विमानाची उंची काही सेकंदांत सुमारे 300 फूट कमी झाली.

हेही वाचा – BMC Doctors Strike: 5 ऑगस्टपासून BMC रुग्णालयांतील OPD सेवा बंद; निवासी डॉक्टरांचा संप

या अनपेक्षित धक्क्यामुळे अनेक प्रवासी आपल्या सीटवरून उडाले, तर कामात व्यस्त असलेल्या केबिन क्रू सदस्यांनाही जबर दुखापत झाली. काहींना किरकोळ, तर काहींना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. विमानातील ही घटना इतकी अचानक घडली की काही क्षणांसाठी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number