ब्रिजभूषण सिंग विरोधात आंदोलन सुरूच

गेल्या दोन दिवसापासून भारतीय कुस्ती महासंघ आणि महिला कुस्तीपटू यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट हिने महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. भारतातील अव्वल दर्जाचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात जंतरमंतरवर […]

ब्रिजभूषण सिंग विरोधात आंदोलन सुरूच

गेल्या दोन दिवसापासून भारतीय कुस्ती महासंघ आणि महिला कुस्तीपटू यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट हिने महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. भारतातील अव्वल दर्जाचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. हुकूमशहाप्रमाणे ते कुस्ती महासंघाचा कारभार करत असल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

या आरोपांवर बृजभूषण सिंग यांनी एक अजब प्रतिक्रिया दिली. बृजभूषण सिंग यांनी आंदोलनकर्ते कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक मिळवू शकत नाही म्हणून आंदोलन करत आहेत. ‘कुस्तीत तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी ही २२ ते २८ या वयादरम्यान करू शकता. जे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत ते ऑलिम्पिक पदक जिंकू शकत नाहीत. त्यामुळे ते रागात आहेत म्हणून ते आंदोलन करत आहेत.’ असे बृजभुषण सिंग म्हणाले आहेत.

भारतातील कुस्ती वाचवण्यासाठी बृजभूषण सिंग यांना त्वरित पदावरून काढून टाकण्याची मागणी या सर्वांनी केली आहे. विनेश फोगाटने सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे देखील आरोप केले आहेत. लैंगिक छळाच्या आरोपाबाबत बृजभूषण सिंग म्हणाले की, ‘जर मी लैंगिक छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला तर स्वतःला फाशी लावून घेईन. ‘तुमच्यासमोर कोणी व्यक्ती आहे का जो सांगू शकेल की फेडरेशन खेळाडूंचा छळ करतोय. फेडरेशनविरूद्ध गेल्या १० वर्षात कोणाला कोणतीच तक्रार नव्हती का? ज्यावेळी नवे नियम लागू करण्यात आले त्यावेळी हा विषय पुढे आला आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number