Student Protest: दिल्लीनंतर आता या राज्यात परीक्षा घोटाळ्याविरोधात उठलं वादळ; CJP चाही पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?

या आंदोलनाला अधिक आक्रमक वळण देण्यासाठी विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांनी अनिश्चित कालीन उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Student Protest: दिल्लीनंतर आता या राज्यात परीक्षा घोटाळ्याविरोधात उठलं वादळ; CJP चाही पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?

Jharkhand Student Protest: दिल्लीनंतर आता झारखंड राज्यही विद्यार्थी आंदोलनाच्या ज्वालांनी पेटून उठलं आहे. विविध महाविद्यालयीन परीक्षांसह 'JSSC-CGL' आणि इतर सरकारी नोकरभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. झारखंड सरकार आणि संबंधित परीक्षा मंडळाच्या भूमिकेमुळे राज्यातील अभ्यासू तरुणांचे मनोबल पार खचले आहे. 

या आंदोलनाला अधिक आक्रमक वळण देण्यासाठी विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांनी अनिश्चित कालीन उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तसेच 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आणि अभिजीत दीपक यांनीही या संघर्षाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून, सध्या सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटो व व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

केंद्रीय यंत्रणांमार्फत निष्पक्ष चौकशीची मागणी
आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 14 वी 'JPSC' पूर्व परीक्षा तातडीने रद्द करणे आणि पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे यांचा समावेश आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 'CID' चौकशीचे निर्देश दिले असले, तरी विद्यार्थी या निर्णयावर समाधानी नाहीत. परीक्षांमधील कथित भ्रष्टाचार पाहता, 'CBI' आणि 'ED' सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडूनच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. जयपाल सिंह स्टेडियमवर सलग 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

हेही वाचा – Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण शरण सिंग यांना दिलासा; आरोपातून निर्दोष मुक्तता

अन्न-पाण्याचा त्याग करून सत्याग्रह तीव्र
विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांनी सांगितले की, परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासूनच या वादाला सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आणि मुख्यमंत्र्यांना पुरावे सादर करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. 'संविधान मार्च' काढूनही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, अखेर विद्यार्थ्यांचे मनोबल कायम राखण्यासाठी आणि हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू करावे लागले आहे. पारदर्शक भरती प्रक्रिया हीच या तरुणांची मुख्य मागणी आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number