अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. निळवंडे धरण तब्बल ५३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास आला आहे. या धरण प्रकल्पासाठी एप्रिल २०२३ अखेर ५७०० कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. या धरणामुळे अहमदनगरच्या सहा दुष्काळ भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल. अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हे धरण महत्वपूर्ण ठरणार आहे. धरणासाठी ५७०० कोटी रूपयांचा खर्च झाला आहे.