नगर पोलीस अधिक्षकांना केंद्रीय बाल हक्क आयोगानं विचारला जाब

दुरगांव ता कर्जत येथील अल्पवयीन दलीत मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १५ दिवस उलटून देखील आरोपीला अद्याप अटक न केल्यामुळे नगर एसपी यांना केंद्रीय बालहक्क आयोगाने नोटीस दिली आहे. दुरगांव ता कर्जत येथील घडलेल्या घटनेसंदर्भात केंद्रीय बालहक्क आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. दुरगांव ता कर्जत येथे एक दलित कुटुंब आपले उदरनिर्वाह करण्यासाठी तेथे एका विटभट्टी […]

नगर पोलीस अधिक्षकांना केंद्रीय बाल हक्क आयोगानं विचारला जाब

दुरगांव ता कर्जत येथील अल्पवयीन दलीत मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १५ दिवस उलटून देखील आरोपीला अद्याप अटक न केल्यामुळे नगर एसपी यांना केंद्रीय बालहक्क आयोगाने नोटीस दिली आहे. दुरगांव ता कर्जत येथील घडलेल्या घटनेसंदर्भात केंद्रीय बालहक्क आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

दुरगांव ता कर्जत येथे एक दलित कुटुंब आपले उदरनिर्वाह करण्यासाठी तेथे एका विटभट्टी वर मजुरी करून आपली उपजीविका भागवत होते. आणि तेथील वीटभट्टीवर काम करणारा नामे अज्जू समसुद्दीन शेख आणि राजू समसुद्दीन शेख यांनी एका दलीत अल्पवयीन मुलीसोबत ओळख केली त्यानंतर काही कामानिमित्त हे आरोपी पीडित तरुणीच्या घरी गेले असता घरी कोणीही नाही याचाच फायदा घेत संबंधित मुलीसोबत ह्या दोनही नराधमांनी पीडित १७ वर्षीय दलीत अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पाच ते सहा दिवसांनी वीट भट्टी मालकाला देखील आरोपी व त्याच्या वडिलांनी मारहाण केली. तसेच सदर आरोपीवर याआधी पण गंभीर गुन्हे दाखल आहेत. पीडितेने तरुणीने संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून आज १५ ते २० दिवस उलटून देखील अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही.

तसेच या गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री.भरत गडकर तसेच कॉन्स्टेबल श्री.कोल्हे व इतर चार ते पाच पोलीस यांनी रात्री बारा वाजता दारू पिऊन मुलीच्या घरी जाऊन दरवाजावर लाथा मारल्या व विचारले की खरच तुझ्यासोबत असे झाले आहे का? आमच्या डोक्याला तुम्ही हा ताप करून ठेवला आहे. व गुन्हा मागे घेण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन चे पीआय दबाव टाकला.

तसेच संबंधित घटने संदर्भात नगर एसपी श्री राकेश ओला यांना वारंवार संपर्क करण्यात आला मात्र त्यांनी कोणत्याही गोष्टीची दखल घेतली नाही याबाबत केंद्रीय बालहक्क आयोगाने देखील ईमेल वर संबंधित घटनेची माहिती एसपी यांच्या कार्यालयाला विचारली असता एसपी कार्यालयाने माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. म्हणून या संदर्भात आज दिनांक ४ मे रोजी एसपी नगर श्री.राकेश ओला यांना केंद्रीय बालहक्क आयोगाने नोटीस काढून संबंधित घटनेची सर्व माहिती घेऊन दिल्ली येथे आयोगाच्या कार्यालयात हजर राहावे असे समन्स,निर्देश आयोगाने दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number