जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खाजगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर २८ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर खोपोली रुग्णालयात उपाचार सुरू असून बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
पुणे येथील समारंभात झांज वाजवण्यासाठी गेलेले मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू झांजपथक मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. बस साधारण १०० फूट दरीत कोसळली असून मदत कार्य वेगाने सुरू आहे. अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे पथक, आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, यशवंती हायकर्स मदत करीत असून लोणावळा येथील शिवदुर्गटीमलाही पाचारण करण्यात आले. अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खोपोलीतील पालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, गंभीर जखमींना कोमोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले असून बचावपथकांकडून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. दरम्यान, या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून ते गोरेगाव येथे जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.