Abhijit Dipke: जंतर-मंतरवर मोठा गोंधळ! अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक; आंदोलनस्थळी गोंधळ

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्या अंगावर एका महिलेने शाई फेकली.

Abhijit Dipke: जंतर-मंतरवर मोठा गोंधळ! अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक; आंदोलनस्थळी गोंधळ

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आज अनपेक्षित घटना घडली. कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकल्याने काही काळ आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी तत्काळ संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून शाईफेकीमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत, “निळा हा माझा आवडता रंग आहे,” असे लिहिले. त्यांच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी दीपके यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करत बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर आंदोलन थांबेल, असा काहींचा समज आहे. मात्र तसे होणार नसून आपण स्वतः आता बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दीपके यांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याच्या पद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, वांगचुक यांच्याशी गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात आली. तसेच दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोपही त्यांनी केला. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने केवळ प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याचा उल्लेख केला होता. मात्र, सोनम वांगचुक यांनी स्वतःची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते आणि उपलब्ध वैद्यकीय अहवालातही त्यांच्या आरोग्याचे निकष सामान्य असल्याचे नमूद करण्यात आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number