सलमानसाठी अब्दूने घेतला मोठा निर्णय

बिग बॉस हिंदीचा १६वा सिझन बराच गाजला. यातला अब्दू रोजिक आठवतोय का? बिग बॉस १६ मध्ये सहभागी झालेला अब्दू हा एक सोशल मीडिया स्टार आहे. त्याच्या सध्या स्वभावामुळे तो प्रेक्षकांना अल्पावधीतच खूप भावला. याचबरोबर अब्दू हा सलमान खानचा मोठा फॅन देखील आहे. तर आता आपल्या आवडत्या स्टार साठी अब्दू ने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतलाय. […]

सलमानसाठी अब्दूने घेतला मोठा निर्णय

बिग बॉस हिंदीचा १६वा सिझन बराच गाजला. यातला अब्दू रोजिक आठवतोय का? बिग बॉस १६ मध्ये सहभागी झालेला अब्दू हा एक सोशल मीडिया स्टार आहे. त्याच्या सध्या स्वभावामुळे तो प्रेक्षकांना अल्पावधीतच खूप भावला. याचबरोबर अब्दू हा सलमान खानचा मोठा फॅन देखील आहे. तर आता आपल्या आवडत्या स्टार साठी अब्दू ने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतलाय.

 
View this post on Instagram
  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

नुकतेच अभिनेता सलमान खानने आपल्या आगामी ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे त्याचे चाहते हा चित्रपट 21 एप्रिल रोजी सिनेमागृहांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशातच ही पोस्ट पाहून अब्दू रोजिक याने पोस्टखाली,”मी या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक करत आहे, कोण येणार आहे माझ्यासोबत बघायला?…”अशी कंमेंट केली आहे. अब्दूची कंमेंट पाहून सलमानचे चाहते खुश झालेत.

किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट असल्याने या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.तर आता अब्दू रोजिक हा सलमान खान याच्या आगामी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number