Aamir Khan Marriage: ‘मनातून तर लग्न झालंच…’ वयाच्या 61व्या वर्षी अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे त्याची होणारी पत्नी?

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाच्या चर्चांना वेग आला आहे.

Aamir Khan Marriage: ‘मनातून तर लग्न झालंच…’ वयाच्या 61व्या वर्षी अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे त्याची होणारी पत्नी?

बॉलिवूडमधील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटांपेक्षा यावेळी त्याच्या कथित तिसऱ्या विवाहाच्या चर्चांनी सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. गेल्या काही वर्षांपासून गौरी स्प्रॅट हिच्यासोबत असलेल्या नात्याला आता अधिकृत रूप मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आमिर खानने यापूर्वी दोन विवाह केले आहेत. पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यासोबतचे त्याचे लग्न अनेक वर्षे टिकले. या नात्यातून त्याला जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर त्याने दिग्दर्शिका किरण राव हिच्याशी विवाह केला. या दोघांना आझाद राव खान हा मुलगा आहे. मात्र २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: Rohini Paradhye Death Case: 'चिमणे, परत ये गं…' रोहिणीच्या पतीची भावनिक पोस्ट; मात्र सोशल मीडियावर वेगळंच चित्र, नेटकऱ्यांना नेमकं काय खटकलं?

घटस्फोटानंतर काही काळ आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारशी चर्चा नव्हती. मात्र नंतर त्याच्या आयुष्यात गौरी स्प्रॅटची एन्ट्री झाली. काही महिन्यांपूर्वी आमिरने स्वतः गौरीची माध्यमांसमोर ओळख करून दिली होती. त्यानंतर दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले आणि त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर आणि गौरी आता आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत विविध चर्चा सुरू असून, हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडू शकतो असे बोलले जात आहे. मोठा सोहळा किंवा सेलिब्रिटींची गर्दी न ठेवता, कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा समारंभ होण्याची शक्यता आहे.

एका मुलाखतीत आमिर खानने गौरीबद्दल बोलताना त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. दोघांमध्ये उत्तम समजूतदारपणा असून नातं खूप मजबूत असल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे आता विवाहाच्या चर्चांनी अधिक वेग घेतला आहे.

हेही वाचा: Amol Kolhe: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका बंद होणार; अमोल कोल्हेंनी सांगितलं मोठं कारण

गौरी स्प्रॅट मूळची बेंगळुरूची असून ती अनेक वर्षांपासून सर्जनशील क्षेत्रात कार्यरत आहे. ती आमिर खानच्या निर्मिती संस्थेशीही संबंधित असल्याचे सांगितले जाते. तसेच गौरी एका मुलाची आई आहे. तिची आई तामिळ तर वडील आयरिश वंशाचे असल्याची माहिती समोर आली आहे.

आमिर आणि गौरी यांच्या वयात जवळपास 14 वर्षांचे अंतर आहे. मात्र दोघांमधील जुळलेली मैत्री आणि समजूतदारपणा यामुळे चाहत्यांमध्ये या जोडीबद्दल उत्सुकता वाढली आहे. आता या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होते, याकडे बॉलिवूड चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number