UIDAI Update: आधार वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! UIDAIचं नवीन फीचर; आता इंटरनेटशिवायही करा KYC, जाणून घ्या कसं

UIDAIने ऑफलाइन KYCची नवी सुविधा सुरू केली आहे. आता OTP किंवा इंटरनेटशिवाय सुरक्षितपणे KYC करता येणार आहे.

UIDAI Update: आधार वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! UIDAIचं नवीन फीचर; आता इंटरनेटशिवायही करा KYC, जाणून घ्या कसं

UIDAI Update: आधार कार्डशी संबंधित KYC प्रक्रियेत आता मोठा बदल करण्यात आला असून, नागरिकांसाठी अधिक सोपी आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध झाली आहे. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) यांनी ऑफलाइन KYCची नवी पद्धत उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आता OTP किंवा इंटरनेटवर अवलंबून न राहता KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. आजपर्यंत अनेक ठिकाणी KYC करताना आधार कार्डची झेरॉक्स प्रत देणे किंवा OTP टाकणे आवश्यक होते. मात्र, यामुळे वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका कायम राहायचा. नवीन ऑफलाइन KYC प्रणालीमुळे हा धोका कमी झाला असून, वापरकर्त्यांना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण मिळणार आहे.

हेही वाचा: AI In Healthcare: डॉक्टर चुकले, पण AI ने ओळखलं; ChatGPT मुळे समोर आला दुर्मिळ आजार; नेमकं काय घडलं?

या पद्धतीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक थेट कोणासोबत शेअर करण्याची गरज नाही. त्याऐवजी एक सुरक्षित डिजिटल फाइल किंवा QR कोडच्या माध्यमातून KYC पूर्ण करता येते. ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असून, बायोमेट्रिक तपासणीचीही गरज भासत नाही.ऑफलाइन KYCचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही कोणती माहिती शेअर करायची हे स्वतः ठरवू शकता. त्यामुळे तुमची गोपनीयता अधिक सुरक्षित राहते. विशेष म्हणजे, ही फाइल डिजिटल सिग्नेचरने सुरक्षित केलेली असते. त्यामुळे त्यात कोणताही फेरफार झाल्यास तो लगेच ओळखता येतो.

हेही वाचा: Google Pay Pocket Money : 'गूगल पे'चे 'पॉकेट मनी' फिचर कसं काम करतं? अफवा खऱ्या की खोट्या?

ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगिन करावे लागेल. त्यानंतर ‘Offline e-KYC’ हा पर्याय निवडून एक ४ अंकी शेअर कोड तयार करावा लागतो. हा कोड पासवर्डसारखा काम करतो. त्यानंतर ZIP फाइल डाउनलोड करून ती संबंधित संस्थेला देऊन KYC प्रक्रिया पूर्ण करता येते.बँका, टेलिकॉम कंपन्या किंवा इतर संस्थांमध्ये KYC करताना ही पद्धत खूप उपयोगी ठरते. विशेषतः ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा मर्यादित आहे किंवा OTP मिळण्यात अडचण येते, अशा ठिकाणी ऑफलाइन KYC अधिक सोयीची ठरते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number