कोयता घेण्यासाठी लागणार आधारकार्ड

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत माजवली असून पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करून सुद्धा कोयता गँगची दहशत कमी होत नाहीये. विशेष म्हणजे या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचं दिसून येत आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पुणे पोलिसांनी नवीन युक्ती काढली आहे. यापुढे शहरात कोयता घ्यायचा […]

कोयता घेण्यासाठी लागणार आधारकार्ड

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत माजवली असून पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करून सुद्धा कोयता गँगची दहशत कमी होत नाहीये. विशेष म्हणजे या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचं दिसून येत आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पुणे पोलिसांनी नवीन युक्ती काढली आहे. यापुढे शहरात कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याचं माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. यामुळे कोयता कोणी विकत घेतला याची माहिती पोलिसांकडे राहणार आहे.

अल्पवयीन मुलांचा या गँगमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असून त्यांच्यामार्फत अनेक ठिकाणी दहशत माजवली जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केल्यानंतर आता कोयता गँग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या पुढे शहरात कुठेही कोयता घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांच्यावतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणार्‍याला आता आधार कार्ड द्यावं लागणार आहे.

कोयता बाळगणायाला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पुणे पोलिसांनी आखली आहे. या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्या गुंडाला पोलिसाने पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number