मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास पेय

मधुमेहाच्या रूग्णांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना आपल्या आहारात देखील काही ठराविक गोष्टींचाच समावेश करता येतो. तर अशाच काही पौष्टिक पेयांबाबत जाणून घेऊया : मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास पेय : नारळ पाणी नारळ पाणी हे सर्वोत्तम पेय आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते. पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स, बी जीवनसत्त्वे, अमीनो ऍसिड इत्यादींसह पोषक नारळाच्या पाण्यात कॅलरीज […]

मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास पेय

मधुमेहाच्या रूग्णांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना आपल्या आहारात देखील काही ठराविक गोष्टींचाच समावेश करता येतो. तर अशाच काही पौष्टिक पेयांबाबत जाणून घेऊया :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास पेय :

नारळ पाणी

नारळ पाणी हे सर्वोत्तम पेय आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते. पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स, बी जीवनसत्त्वे, अमीनो ऍसिड इत्यादींसह पोषक नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात. रक्तातील साखर राखण्याव्यतिरिक्त ते पचनशक्ती, त्वचेचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

ताक

ताक देखील एक उत्तर पेय आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारात ताकाचा नक्की समावेश करावा.

गव्हाच्या कुड्या

गव्हाच्या कुड्यांमध्ये जीआई इंडेक्स कमी असतो ते मधुमेहाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर मानले जाते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी गव्हाच्या कुड्यांचे पाणी फायदेशीर ठरते. त्यामुळे कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते.

कारल्याचा रस

मधुमेहाच्या रुग्णांना फळांचे रस न पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु हा नियम भाजीपाल्यांच्या रसांना लागू होत नाही. त्यामुळे कारल्याचा किंवा करवंदाचा रस उत्तम आहे. या भाजीमध्ये अशी संयुगे असतात जी रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

आवळ्याचा रस

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा हा उत्तम पर्याय आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम हे खनिज असते जे कर्बोदकांचे चयापचय नियंत्रित करते. या सर्व गोष्टी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number