अतिक-अशरफ यांच्यावर बनणार चित्रपट ?

शनिवारी आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या पोलिस अतिक आणि अशरफ यांच्या हत्येचे गूढ सोडवण्यात व्यस्त आहेत.परंतू या दोघांची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली, ती घटना एखाद्या ऍक्शन सिनेमाच्या सीनपेक्षा कमी नाही. या प्रकरणाची खळबळ माजलेली असताना.या धक्कादायक घटनेवर […]

अतिक-अशरफ यांच्यावर बनणार चित्रपट ?

शनिवारी आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या पोलिस अतिक आणि अशरफ यांच्या हत्येचे गूढ सोडवण्यात व्यस्त आहेत.परंतू या दोघांची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली, ती घटना एखाद्या ऍक्शन सिनेमाच्या सीनपेक्षा कमी नाही. या प्रकरणाची खळबळ माजलेली असताना.या धक्कादायक घटनेवर सिनेमा बनवण्याची निर्माते आणि दिग्दर्शकांची तयारी सुरु झाली आहे. याआधी देखील अनेक गँगस्टरच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये बऱ्याच खऱ्याखुऱ्या गुंडांवर चित्रपट बनले आहेत… ‘मुंबई सागा’, ‘हसिना पारकर’, ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘डी डे’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई…’ असे अनेक सिनेमे आहेत ज्यांच्यामाध्यमातून खऱ्या आयुष्यातील गुंडांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले.या नंतर आता अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या या घटनेलाही सिनेमाचं रूप मिळू शकते.

अतिक आरोपी गँगस्टर अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर आव्हान स्वीकारणारे काही दिग्दर्शक या दोघांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करु शकतात. अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप याचे नाव समोर येत आहे. अनुराग कश्यपने या आधीही  गुंडांच्या आयुष्यावर आधारित ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे तो आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या पोलिस अतिक आणि अशरफ यांच्यावर ही चित्रपट बनवणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number