झारखंडमधील इमारतीला भीषण आग

झारखंडमधील धनबाद येथे भीषण आगीची घटना समोर आली आहे. धनबाद येथील आशीर्वाद या इमारतीत आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यााठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धनबाद येथील मोड पोलीस ठाणे परिसरात शक्ती मंदिराजवळ आशीर्वाद ही इमारत आहे. सायंकाळच्या सुमारास या इमारतीत भीषण आग […]

झारखंडमधील इमारतीला भीषण आग

झारखंडमधील धनबाद येथे भीषण आगीची घटना समोर आली आहे. धनबाद येथील आशीर्वाद या इमारतीत आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यााठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धनबाद येथील मोड पोलीस ठाणे परिसरात शक्ती मंदिराजवळ आशीर्वाद ही इमारत आहे. सायंकाळच्या सुमारास या इमारतीत भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निमशन दलाच्या गाड्या आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे.

आगीत १४ जणाचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये १० महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. तर १२ जण जखमी झालेत. इमारतीत आणखी रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. इमारतीत लग्न समारंभ होता. यासाठी अनेक नातेवाईक एकत्र आले होते. मध्यरात्री अचानक आग लागली. अग्निशमन दलाचं विभाग घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरु आहे.

पीडित महिलेने सांगितले की, आम्ही आमच्या भाचीच्या लग्नाची तयारी करत असताना खोलीत धूर येताना दिसला. माझ्या मेव्हण्याने आम्हाला सांगितले की आग लागली आहे.आम्ही चौथ्या मजल्यावर होतो आणि खाली जाण्याचा प्रयत्न केला पण धुरामुळे गुदमरल्यासारखे वाटले म्हणून आम्ही गच्चीवर गेलो.पोलीस आले आणि आम्हाला वाचवले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number