अर्जुन खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल

शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई आणि १९ वर्षांखालील युवा संघाचा माजी कर्णधार विजय झोल याच्यावर एका उद्योजकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम […]

अर्जुन खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल

शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई आणि १९ वर्षांखालील युवा संघाचा माजी कर्णधार विजय झोल याच्यावर एका उद्योजकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. क्रिप्टोकरंसीमध्ये ५०० कोटींचा घोटाळा प्रकरणी खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण खरात हे घनसावंगी तालुक्यात राहत असून क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रमोटर म्हणून काम करतात. याच्याच एका व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली. या क्रिप्टो करन्सीची मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरून क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केलाय. पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह १५ जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे संबंधित प्रकरणावरुन काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील किरण खरात यांची सुपारी दिल्याचा, गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला. खोतकर आणि झोल यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं. कैलास गोरंट्याल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले.

काय म्हणाले अर्जुन खोतकर ?

जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाची कावीळ झाली आहे. संताजी आणि धनाजी जसे विरोधकांना दिसायचे तसे खोतकर आणि झोल या आमदारांना जेवताना, झोपताना दिसतो. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून अंदाजे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यामध्ये या आमदार कैलास गोरंट्याल काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी मी पोलिसांकडे करणार असल्याचं खोतकर यांनी म्हटले आहे. शिवाय आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गोरंट्याल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खोतकरांनी केलीय. क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्या लोकांचे पैसे बुडाले आहे, त्या लोकांचे पैसे आमदारांनी द्यावे असंही ते म्हणाले. लोकांचे बुडालेले पैसे आणून द्या, अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा देखील खोतकरांनी दिला. आमदाराने हा विषय माझ्या परिवारापर्यंत नेला असून मी एवढ्या खालच्या थराला कधी गेलो नाही. माझ्या जावयाचे आणि किरण खरात यांचे चांगले संबंध असून माझ्या जावयाने एवढ्या अडचणीच्या काळातही किरण खरातला पैशांची मदत केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number