8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी? 8वा वेतन आयोग ठरू शकतो गेमचेंजर

आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन चर्चांना वेग आला असून, सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या एरियरची शक्यता वर्तवली जात आहे.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी? 8वा वेतन आयोग ठरू शकतो गेमचेंजर

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आठवा वेतन आयोग हा सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे. पगारवाढ कधी होणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एरियर किती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर काही अंदाज समोर आले असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर सरकारने 20 महिन्यांचा एरियर मंजूर केला, तर काही कर्मचाऱ्यांना लाखोंमध्ये रक्कम मिळू शकते. विशेषतः ज्यांची बेसिक सॅलरी सुमारे 50,000 रुपये आहे, त्यांना अंदाजे 3.5 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंत एरियर मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ही आकडेवारी अधिकृत नसून सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: ATM मधून पैसे निघाले नाहीत, पण खात्यातून कट झाले; अखेर 10 हजारांसाठी बँकेला मोजावे लागले इतके लाख!

एरियरची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या पे लेव्हलनुसार बदलू शकते. उदाहरणार्थ, लेव्हल 1 मधील कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी सध्या 18,000 रुपये आहे. अशा कर्मचाऱ्यांना साधारण 3.5 लाख ते 5.5 लाख रुपयांपर्यंत एरियर मिळू शकतो. तर लेव्हल 3 मधील कर्मचाऱ्यांना 4 लाख ते 6.5 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होण्याची शक्यता आहे.

याचप्रमाणे, लेव्हल 5 कर्मचाऱ्यांसाठी एरियरची रक्कम 5.5 लाख ते 9 लाख रुपयांच्या दरम्यान जाऊ शकते. तर लेव्हल 8 मधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना 9 लाख ते जवळपास 15 लाख रुपयांपर्यंत एरियर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, फिटमेंट फॅक्टर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता. आता आठव्या वेतन आयोगासाठी 2.0 ते 2.57 दरम्यान फिटमेंट फॅक्टर राहू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र कर्मचारी संघटनांकडून हा फॅक्टर 3.0 ते 3.25 करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर पगारवाढ आणखी मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

हेही वाचा: Gold Rate Drop: सोनं होणार स्वस्त! 1 लाख 27 हजार रुपयांपर्यंत दर कोसळण्याचा तज्ज्ञांचा अंदाज; जागतिक बाजारातील हालचाली काय आहेत?

सरकारकडून अद्याप आठव्या वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरीही या चर्चांमुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आगामी काळात सरकार या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम आकडेवारी आणि अंमलबजावणीबाबत स्पष्टता येईपर्यंत हे सर्व अंदाजच मानले जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number