केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत भरघोस वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 8 वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत कुटुंबाचा देखील विचार करण्यात येणार आहे.
एनसी-जेसीएमच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अशी मागणी करण्यात आली आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत यापुढे पत्नी, मुलांसह आईवडिलांचाही विचार करण्यात यावा. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. याला अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. आता ही मागणी वेतन आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.
हेही वाचा- FDI Investment: चीनसह शेजारील देशांसाठी भारताची गुंतवणुकीची दारे उघडली; कॅबिनेटचा एफडीआय नियमांमध्ये मोठा बदल; काय आहे कारण?
यापूर्वी किमान वेतन निश्चित करण्यासाठी कुटुंब युनिट 3 ठरवण्यात आले होते ज्यात ज्यात पती, पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश होता. ज्याला अनेकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मागणी केली आहे की, कुटुंब युनिट 3 वरून 5 पर्यंत वाढवण्यात यावी. मागणी मान्य झाल्यास कर्मचाऱ्याची पत्नी, मुलासह आई-वडिलांचाही समावेश होईल.