मुंबईत ८ हजार सिमकार्ड दुसऱ्याच्या नावावर

मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये सिमकार्ड विक्रेते बनावट कागदपत्रे वापरून ग्राहकांनी सादर केलेल्या तपशीलांच्या आधारे बनावट कागदपत्रे वापरून सिमकार्ड सक्रिय करत होते. माहिती प्राप्त करून मोबाईल धारकाचे फोटो व त्यांची माहिती यांचे विश्लेषण केले. काही व्यक्ती हे स्वतः चे वेगवेगळ्या वेशभुषेतील फोटोचा वापर करून बनावट आधारकार्ड तयार करून, ते खरे असल्याचे भासवले. […]

मुंबईत ८ हजार सिमकार्ड दुसऱ्याच्या नावावर

मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये सिमकार्ड विक्रेते बनावट कागदपत्रे वापरून ग्राहकांनी सादर केलेल्या तपशीलांच्या आधारे बनावट कागदपत्रे वापरून सिमकार्ड सक्रिय करत होते. माहिती प्राप्त करून मोबाईल धारकाचे फोटो व त्यांची माहिती यांचे विश्लेषण केले. काही व्यक्ती हे स्वतः चे वेगवेगळ्या वेशभुषेतील फोटोचा वापर करून बनावट आधारकार्ड तयार करून, ते खरे असल्याचे भासवले. त्याचा वापर काही टेलिफोन कंपन्यांनी त्यांना विश्वासाने सोपविलेली सिमकार्ड ॲक्टीव्ह करून ते स्वतःच्या फायदयासाठी वितरित केल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २,१९७ सिमकार्ड, चार लॅपटॉप आणि ६० मोबाईल जप्त केले आहेत.

वेगवेगळ्या वेशभूषेत व बनावट कागदपत्रे बनवुन अॅक्टीवेट करण्यात आलेली सिम कार्डस जप्त करण्यात आली. व्ही पी मार्ग पोलीस ठाण्याने एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून ३७६ सिम कार्ड जप्त केले आहे. तर डी बी मार्ग पोलीस ठाण्याने दोन आरोपींना अटक करून त्याच्याकडून ३३९ सिम कार्डस जप्त केली. त्याचप्रमाणे मलबार हिल पोलिसांनी एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून ६८४ सिम कार्ड जप्त केली आहेत. तसेच सहार पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४६९ सिम कार्ड्स हस्तगत केली आहे.

२ हजार १९७ सिम कार्ड जप्तः त्याचप्रमाणे बांगुर नगर पोलीसांनी पाच आरोपींकडून ३२७ सिम कार्ड्स जप्त केली आहेत. अशा प्रकारे संबंध मुंबईत १३ आरोपी अटक करत त्यांच्याकडून २ हजार १९७ सिम कार्ड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक १३ आरोपीतांकडे अधिक तपास करून सिम कार्डची विक्री करणाऱ्या इतर व्यक्तीचा शोध घेवून आणि बनावट सिमकार्डचा वापर करणाऱ्या कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number