नूपुर शर्मा विरोधात एमआयएम आक्रमक

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल देशभरातील मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला गेला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये हजारो मुस्लिम बांधव आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी नुपूर शर्मांच्या विरोधात निदर्शने दिली. त्याचबरोबर सोलापुरातही निदर्शने केली गेली. शुक्रवारी पवित्र नजाम पठण केलं जातं. […]

नूपुर शर्मा विरोधात एमआयएम आक्रमक

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल देशभरातील मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला गेला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये हजारो मुस्लिम बांधव आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी नुपूर शर्मांच्या विरोधात निदर्शने दिली. त्याचबरोबर सोलापुरातही निदर्शने केली गेली. शुक्रवारी पवित्र नजाम पठण केलं जातं. त्यानुसार आज देशभरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठण केल्यानंतर मशिदीबाहेर निदर्शने केली केली जात आहे. या आंदोलनात लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. औरंगाबाद पाठोपाठ सोलापूर, परभणी, रायगड अशी अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून निदर्शने दिली गेली.

औरंगाबादमध्ये आज नमाज पठण झाल्यानंतर हजारो मुस्लिम बांधव हे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर एकत्र जमले. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करा, अशी मागणी आंदोलकांकडून केली गेली आहे. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. अनेकांकडून टाळ्या वाजवत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करत आक्रोश केला. या आंदोलनादरम्यान पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. एवढी मोठी गर्दी एकत्र उसळल्यानंतर काही विपरीत होणार नाही याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी परिस्थिती सांभाळली आहे. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल घटनास्थळी आले. तेदेखील आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number