सदावर्तेंना ५ दिवसांची पोलीस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सदावर्ते यांना कोल्हापूर सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून कोल्हापूर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस […]

सदावर्तेंना ५ दिवसांची पोलीस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सदावर्ते यांना कोल्हापूर सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून कोल्हापूर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गिरगाव न्यायालयाने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे सोपावला आहे. कोल्हापूरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केला असल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी केली आहे. त्यानुसार, सदावर्तेंविरोधात १५३ (अ) अंतर्गत कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुरुवारी त्यां कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले असून कोल्हापूर न्यायालयाने सदावर्तेंना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number