नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असल्याने वन विभागाचं कौतुक केलं होतं. मात्र गेल्या आठ महिन्यांतच विदर्भात 12 वाघांची शिकार झाल्याची खळबळजनक बातमी पुढे आली आहे. चंद्रपुरात गेल्या दीड महिन्यांत 4 वाघांची शिकार झाल्याचं पुढे आलंय.
या वाघांचा मृत्यू हा विष प्रयोगातूनच झाल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे गावाशेजारी पावसाळ्यात शिकारीला येणाऱ्या वाघांची काळजी वन विभागातील सक्षम अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात येतंय.
तसंच गावात जनजागृति आणि सहकार्य करण्याचं आवाहन वन विभगाने करण्यात यावं, ज्यामुळे वन्य जीव व मनुष्य संघर्ष कमी होऊन जीवित हानी होण्याचे टाळता येईल असं आवाहन करण्यात येतंय.
वाघांची शिकार होत असल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये नाराजी आहे. एकीकड़े शासन वाघांचं संवर्धन आणी संरक्षण करण्यासा कोट्यवधी रुपयांचा निधि खर्च करतंय.
मात्र छोट्या छोट्या चुकीमुळे याच वाघांचा मृत्यु होतोय.
आता तरी वन विभागातील अधिकाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकून जागृती करण्याची वेळ आली आहे
राज्यात वाघांच्या संख्येत वाढ झाल्याने पंतप्रधान, वनमंत्री, वन्यजीव प्रेमी आनंदित आहेत, मात्र जर असंच विष देउन वाघाची शिकार होत असेल, तर मात्र भारतातून वाघ नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. वाघाची शिकार रोखण्यासाठी वन विभागाने वाघांच्या संरक्षणासाठी जनजागृति करण्याची गरज आहे.