भाजपा चिन्हावरच जागा लढवल्या जातील – जयंत पाटील

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे विधान केले. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप शिवसेनेला 48 जागा सोडायला तयार दिसतयं मात्र, निवडणुकीला अजून एक वर्ष असून 288 जागा भाजपा चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिवसेनेचा नामोनिशाणही राहणार […]

भाजपा चिन्हावरच जागा लढवल्या जातील – जयंत पाटील

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे विधान केले. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप शिवसेनेला 48 जागा सोडायला तयार दिसतयं मात्र, निवडणुकीला अजून एक वर्ष असून 288 जागा भाजपा चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिवसेनेचा नामोनिशाणही राहणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात भाजप निवडणूक लढवले आणि मविआच्या समोर फक्त भाजप असेल. तोपर्यंत शिवसेना टिकेल असे मला वाटत नाही, असे जयंत पाटील म्हणाले. भाजपाने स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम केले आहे. त्यांचा मित्र असो किंवा शत्रू, त्यांना फोडणे, त्यांच्यावर कारवाई करणे आणि त्यांची मते आपल्याकडे वळवणे हा भाजपाचा कार्यक्रम असतो, असेही ते म्हणाले.’

तसेच, ‘शिवसेना राहील की नाही हे सर्वस्वी जनतेच्या हाती आहे. शिवसेना पक्ष राहिला तर भाजप सर्वेक्षण करेल आणि जाहीर केलेल्या 48 जागांपैकी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगतील तुमच्या 5 ते 6 जागा निवडून येणार आहेत. उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय दोतो, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.’

चंद्रशेखर बावनुकळे काय म्हणाले?

मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांची बैठक पार पडली. याबैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे वक्तव्य केलं. तसेच भाजपा 240 जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता असल्यामुळे प्रसारमाध्यमांवरील बावनकुळेंचा व्हिडिओ हटवण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number