पेपरफुटी आणि टीईटी घोटाळा प्रकरणनी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या पेपर घोटाळाप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी कारवाई करत २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
टीईटी घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. तर यांच्यासह महेश बोटले, अश्विनी कुमार यांच्यासह अनेक आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत.
पेपरफुटी आणि टीईटी घोटाळा प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ कोटी रुपये आणि सोने-चांदी जप्त केली आहे. तुकाराम सुपे यांच्याकडून तीन कोटींहून अधिक रक्कम आणि दीड किलो सोन्याची दागिनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या दागिन्यांची किंमत ७३ लाख इतकी आहे. तर टीईटी घोटाळाप्रकरणी अश्विन कुमार यांच्या बंगळुरूच्या घरातून २४ किलो चांदी, दोन किलो सोने जप्त केले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच असून याप्रकरणी अधिक व्याप्ती वाढण्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे.
पेपरफुटी घोटाळा प्रकरणी राज्यातील ४०० ते ५०० विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांची जोरदार तयारी केलेली होती. मात्र ऐनवेळी प्रश्नपत्रिका फुटणे, तसेच टीईटी घोटाळा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या रद्द केल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. तसेच पेपरफुटी आणि टीईटी घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून आता अनेक आरोपींची नावे समोर येत आहेत. तर या आरोपींकडून ४ कोटीहून अधिक रुपये आणि सोने-चांदी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू ठेवला असून अजूनही यांची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.