‘सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच’ – देवेंद्र फडणवीस

राज्यातील विविध विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकरीप्रश्नी फडणवीस आंदोलनात सहभागी झाले असून यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना काळात आदिवासींना मदत करण्याचा आक्रोश आम्ही करत होते. मात्र, सरकारने दारू दुकानदारांना मदत केली. तसेच राज्यसरकारने शेतकऱ्यांचे पन्नास टक्के वीजबीलसुद्धा […]

‘सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच’ – देवेंद्र फडणवीस

राज्यातील विविध विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकरीप्रश्नी फडणवीस आंदोलनात सहभागी झाले असून यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना काळात आदिवासींना मदत करण्याचा आक्रोश आम्ही करत होते. मात्र, सरकारने दारू दुकानदारांना मदत केली. तसेच राज्यसरकारने शेतकऱ्यांचे पन्नास टक्के वीजबीलसुद्धा माफ केले नाही. या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिम्मत नाही. आम्ही जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही, अन्याय झाला तर जनता तक्त पालटून टाकेल, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच हे सरकार भ्रष्टाचारी सरकार असून सरकारमध्येच भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरू आहे. दोन्ही संघ यांच्याच असून जिथे जाऊ तिथे खाऊ, असे हे सरकार असल्याचा घणाघातही फडणवीस यांनी केला आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1ZkJzbOpOdZJv?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510914097927245826%7Ctwgr%5Ehb_2_8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmaharashtra%2Fdevendra-fadnavis-20-20-matches-of-corruption-in-government-devendra-fadnaviss-tikastra-on-mahavikas-aghadi-a732%2F

राज्य सरकारविरोधात या आंदोलनासाठी भाजपाने तयारी केली असून गडचिरोली-चंद्रपूर रस्त्यावरील अभिनव लॉन येथे सभेचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या, ओबीसी आरक्षण आणि इतर प्रश्नांवर गडचिरोलीत दवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकरीप्रश्नी आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सहभागी होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number