नदीत एसटी बस कोसळून १३ ठार

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस नर्मदा नदीत कोसळली होती. बस अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असल्यातचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय ११ प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे.  मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्र […]

नदीत एसटी बस कोसळून १३ ठार

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस नर्मदा नदीत कोसळली होती. बस अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असल्यातचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय ११ प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे.  मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी मध्य प्रदेशातील प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

एसटी महामंडळाची ही बस जळगाव जिल्ह्यातील होती. सकाळी साडेसात वाजता ही बस इंदौरहून निघाली होती. ही बस अंमळनेरला येणार होती. मात्र, धार जिल्ह्यात नर्मदा नदीच्या पुलावरून जात असताना या बसचा अपघात झाला, असे शेखर चन्ने यांनी सांगितले.

मध्यप्रदेशात नर्मचा नदीत कोसळलेल्या महामंडळाच्या बस अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. शिंदे स्वत: बचाव कार्यावर लक्ष ठेवत ते व्यवस्थित पार पाडावे आणि जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या सोबत मृतांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदोर-अमळनेर ही एसटी बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्याकुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत.काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. अशी, माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार, एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध, बचावकार्य वेगाने केले जात आहे. असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number