पंढरपूरात ११५ मठ व धर्मशाळा इमारती धोकादायक

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील मठ धर्मशाळा राहती घरे यांचे सर्वेक्षण नुकतेच पंढरपूर नगर परिषदेने केले. यामध्ये शहरातील ११५ मठ, धर्मशाळा आणि घरांच्या इमारती या धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारती उतरवून घेण्याचे काम देखील आता नगरपालिका प्रशासन हाती घेत आहे. तर काही दुरुस्तीला आलेल्या इमारती बाबत संबंधित मालमत्ता धारकांना सूचना देण्यात आले आहेत. अशा […]

पंढरपूरात ११५ मठ व धर्मशाळा इमारती धोकादायक

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील मठ धर्मशाळा राहती घरे यांचे सर्वेक्षण नुकतेच पंढरपूर नगर परिषदेने केले. यामध्ये शहरातील ११५ मठ, धर्मशाळा आणि घरांच्या इमारती या धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारती उतरवून घेण्याचे काम देखील आता नगरपालिका प्रशासन हाती घेत आहे. तर काही दुरुस्तीला आलेल्या इमारती बाबत संबंधित मालमत्ता धारकांना सूचना देण्यात आले आहेत. अशा धोकादायक मठ धर्मशाळा व इमारतींमध्ये भाविकांनी राहू नये. आपल्या जीविताच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले. तसेच धोकादायक इमारतींवर संबंधित इमारत धोकादायक आहे अशा पद्धतीच्या सूचना आणि फलक देखील लावण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number