मोदींनी मतदारांना केले मतदान करण्याचे आवाहन

नागपूर,१९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : देशातील लोकसभा निवडणुकीला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत मतदारांना मतदान करण्यास सांगितले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत असल्याने या जागांसाठी […]

मोदींनी मतदारांना केले मतदान करण्याचे आवाहन

नागपूर,१९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : देशातील लोकसभा निवडणुकीला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत मतदारांना मतदान करण्यास सांगितले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत असल्याने या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं आवाहन मोदींनी केले आहे. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्यास सांगत ते पुढे म्हणाले, शेवटी प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो असे म्हणत मोदींनी पोस्ट शेअर केली आहे.  

पंतप्रधान मोदी शुक्रवारी प्रचारादरम्यान नागपुरात वस्तीला आहेत. नागपूर राजभवनात रात्री निवासी असणार आहेत. वर्ध्याची सभा आटोपून पंतप्रधान नागपुरात निवासी राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number