सनी लिओनीचं मार्शमेलोसोबत खास कोलॅब !

मुंबई, २७ मार्च २०२४ , प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय कलाकार मार्शमेलोच्या नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टला मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला. मार्शमेलोच्या कॉन्सर्टमध्ये आणखी एक गोष्टीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेत्री आणि उद्योजक सनी लिओनी. या कॉन्सर्टमध्ये सनीने चक्क डीजेची भूमिका बजावली. २०,०००हून अधिक प्रेक्षक सनीचा हा नवा अवतार पाहून आणखी उत्साही झाले होते. यावेळी सनीने ‘बेबी डॉल’, […]

सनी लिओनीचं मार्शमेलोसोबत खास कोलॅब !

मुंबई, २७ मार्च २०२४ , प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय कलाकार मार्शमेलोच्या नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टला मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला. मार्शमेलोच्या कॉन्सर्टमध्ये आणखी एक गोष्टीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेत्री आणि उद्योजक सनी लिओनी. या कॉन्सर्टमध्ये सनीने चक्क डीजेची भूमिका बजावली. २०,०००हून अधिक प्रेक्षक सनीचा हा नवा अवतार पाहून आणखी उत्साही झाले होते. यावेळी सनीने ‘बेबी डॉल’, ‘मेरा पिया 2.0’ या गाण्यांवर ठेका धरत प्रेक्षकांना भुरळ पाडली.

त्यानंतर सनी लिओनीने माश्मेलोचा मास्क घातला. विशेष म्हणजे ही संधी मिळवणारी ती शॉन मेंडिसनंतरची दुसरी कलाकार आहे. आंतरराष्ट्रीय संगीत निर्माता मार्शमेलोच्या सनी लिओनसोबतच्या सहकार्याने प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव दिला.

या वर्षी तिने नॉन-स्टॉप शूटिंग केल्यामुळे अभिनेत्रीसाठी हा एक योग्य ब्रेक होता. वर्क फ्रंटवर, अभिनेत्रीकडे ‘Splitsvilla X5’ आहे. ती ‘ग्लॅम फेम’ या रिॲलिटी शोला जज करतानाही दिसणार आहे. सनीला अनुराग कश्यपचा बहुप्रतिक्षित ‘केनेडी’ आहे, जो रिलीज होण्याच्या तयारीत आहे. तिचा ‘कोटेशन गँग’ हा तमिळ चित्रपटही पाइपलाइनमध्ये आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number