अक्षय कुमार दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा आणि निर्माता महावीर जैन यांच्यासोबत काम करणार ?

अक्षय कुमारचे कॉमिक टायमिंग, त्याच्या ॲक्शन फिल्म्स याच सर्वांनी कौतुक केले आहे. हाऊसफुल, वेलकम, आणि हेरा फेरी सारख्या कॉमेडी फ्रँचायझींसाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमार हा इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकून घेतो यात शंका नाही. सध्या एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे अक्षय कुमार चित्रपट निर्माते मृगदीप सिंग लांबा यांच्याशी सहयोग करण्यास सज्ज आहे. […]

अक्षय कुमार दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा आणि निर्माता महावीर जैन यांच्यासोबत काम करणार ?

अक्षय कुमारचे कॉमिक टायमिंग, त्याच्या ॲक्शन फिल्म्स याच सर्वांनी कौतुक केले आहे. हाऊसफुल, वेलकम, आणि हेरा फेरी सारख्या कॉमेडी फ्रँचायझींसाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमार हा इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकून घेतो यात शंका नाही. सध्या एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे अक्षय कुमार चित्रपट निर्माते मृगदीप सिंग लांबा यांच्याशी सहयोग करण्यास सज्ज आहे.

पिंकविलाने नुकत्याच केलेल्या एका बातमीने एका स्रोताने आगामी सहकार्याबद्दल हि खास गोष्ट सांगितली आहे “अक्षयला कॉमेडी शैली देखील आवडते आणि तो त्याच्या निर्दोष कॉमिक टाइमिंगला न्याय देणाऱ्या स्क्रिप्ट्स शोधत आहे. त्याने अलीकडेच मृगदीप सिंग लांबा यांची भेट घेतली आणि या कल्पनेने तो भारावून गेला, कारण दिग्दर्शक फुकरे फ्रँचायझीनंतर आणखी एक ‘हटके’ जग निर्माण करण्याचा विचार करत आहे.”

शिवाय या प्रकल्पाची माहिती देताना, स्त्रोताने असेही सांगितले की, “सर्व विनोदी चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही अक्षय कुमार दिसणार आहे. सध्या कास्टिंग चालू असून अजून कोण कोण कलाकार यात दिसणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे ” या अहवालात असे सूचित होते की हा चित्रपट गौतम मेहरा यांनी लिहिला आहे तर महावीर जैन याची निर्मिती करणार आहेत.

दरम्यान अक्षय कुमार सध्या ॲक्शन एंटरटेनर बडे मियाँ छोटे मियाँसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये तो टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, अलाया एफ, पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत दिसणार असून 2024 च्या ईद दरम्यान रिलीज होणार आहे. याशिवाय, त्याच्याकडे वेलकम टू द जंगल, हाऊसफुल 5, सरफिरा यासारखे चित्रपट आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number