काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! यादीत सगेसोयरेच

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ तसेच प्रद्युत बोर्डोलोई या लोकसभेच्या तीन विद्यमान खासदारांचा समावेश असलेल्या ४३ उमेदवारांची दुसरी यादी आज काँग्रेसने जाहीर केली. आसामच्या बारपेटा मतदारसंघाचे खासदार अब्दुल खलिक यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्याजागी दीप बायान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा गौरव गोगोई आसामच्या कालियाबोर […]

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! यादीत सगेसोयरेच

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ तसेच प्रद्युत बोर्डोलोई या लोकसभेच्या तीन विद्यमान खासदारांचा समावेश असलेल्या ४३ उमेदवारांची दुसरी यादी आज काँग्रेसने जाहीर केली. आसामच्या बारपेटा मतदारसंघाचे खासदार अब्दुल खलिक यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्याजागी दीप बायान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा गौरव गोगोई आसामच्या कालियाबोर मतदारसंघाऐवजी जोरहाट मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. छिंदवाडा मतदारसंघातून नकुल नाथ दुसऱ्यांदा निवडणूक लढतील. गेल्या वेळी जोधपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरुद्ध पराभूत झालेले राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे बडे नेते अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यावेळी जालोर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी ही यादी जाहीर केली.

युवकांना संधी

या यादीत २५ उमेदवारांचे वय ५० वर्षांखालचे असून ५१ ते ६० वयोगटातील ८ तर ६१ ते ७२ वयोगटातील १० उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने शनिवारी, ९ मार्च रोजी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आतापर्यंत जाहीर केलेल्या ८२ उमेदवारांमध्ये काँग्रेसने ७६.७ टक्के ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्यक उमेदवारांना संधी दिली आहे.

काँग्रेसचे राज्यनिहाय उमेदवार

आसाम १२
राजस्थान १०
मध्य प्रदेश १०
गुजरात ७
उत्तराखंड ३
दमण आणि दीव १

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number