सेला बोगद्याचे उद्घाटन

नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमांतर्गत सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर तेरा हजार फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेला हा […]

सेला बोगद्याचे उद्घाटन

नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमांतर्गत सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर तेरा हजार फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेला हा बोगदा बलीपारा-चरिदुआर-तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. त्यामुळे सशस्त्र दलांची सज्जता वाढेल आणि सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. या बोगद्यामुळे चीनची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जाते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number