‘अग्नी – ५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी’

नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारताच्या अग्नि ५ या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी अर्थात ‘मिशन दिव्यास्त्र’ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून ते मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकलद्वारे (MIRV) प्रक्षेपित करण्यात आलं आहे. यासाठी पंतप्रधानांनी ट्विट करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदनही केलं आहे. सन २०२२ मध्ये भारताच्या सर्वाधिक शक्तीशाली अग्नि […]

‘अग्नी – ५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी’

नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारताच्या अग्नि ५ या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी अर्थात ‘मिशन दिव्यास्त्र’ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून ते मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकलद्वारे (MIRV) प्रक्षेपित करण्यात आलं आहे. यासाठी पंतप्रधानांनी ट्विट करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदनही केलं आहे.

सन २०२२ मध्ये भारताच्या सर्वाधिक शक्तीशाली अग्नि ५ या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावेळी या क्षेपणास्त्रानं ५५०० किमी अंतरावरील टार्गेट उद्ध्वस्त केलं होतं. या मिसाईलला डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडनं संयुक्तरित्या बनवलं आहे. भारताच्या या क्षेपणास्त्राची चीनसह इतर देशांना भीती आहे कारण हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून त्याच्या रेंजमध्ये हे देश येतात.

डीआरडीओचं मिशन दिव्यास्र यशस्वी

पंतप्रधान मोदींनी अधिकृत एक्स मीडिया अकाऊंटवर ट्वीट करत म्हटलं आहे की, “मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या डीआरडीओ शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. असं मोदींनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number