निवडणूक आयुक्तांचा राजीनामा

नवी दिल्ली, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपणार होता. पण त्यांनी आधीच राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू् यांनी त्यांचा राजीनामा राजीनामा स्वीकारला. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे या वर्षी फेब्रुवारीत निवृत्त झाले. आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला. यामुळे निवडणूक आयोगावर […]

निवडणूक आयुक्तांचा राजीनामा

नवी दिल्ली, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपणार होता. पण त्यांनी आधीच राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू् यांनी त्यांचा राजीनामा राजीनामा स्वीकारला.

निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे या वर्षी फेब्रुवारीत निवृत्त झाले. आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला. यामुळे निवडणूक आयोगावर फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार कार्यरत आहेत. देशाच्या निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असे तीन जण कार्यरत असतात. यातील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पण दोन्ही निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. या पदांवर कोणाची नियुक्ती होणार आणि ती कधी होणार हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.

अरुण गोयल यांचा राजीनामा शनिवार ९ मार्च २०२४ रोजी स्वीकारण्यात आला. याआधी गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी २१ नोव्हेंबर २०२२ रोजी नियुक्ती झाली होती. या पदावर नियुक्ती होण्याआधी ते भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव होते. त्यांनी सांस्कृतीक मंत्रालयात देखील काम केले होते. गोयल यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाची सगळी जबाबदारी सध्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे आली आहे. राजीव कुमार यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number