नवी दिल्ली, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांचे ट्वीट करून अभिनंदन केले.
सुधा मूर्ती या टाटा समुहाच्या टेल्को कंपनीच्या पहिल्या महिला अभियंता होत्या. पतीला साथ देत त्यांनी इन्फोसिसच्या स्थापनेसाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवले होते. नंतर इन्फोसिसच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. कंपनीच्या सामाजिक कार्य विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुधा मूर्ती यांनी नंतर महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी दीर्घ काळ काम केले.
कोण आहेत सुधा मूर्ती ?
सामाजिक कार्यासाठी २०२३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरव
सामाजिक कार्यासाठी २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव
शिक्षिका आणि लेखिका, अनेक कथासंग्रह, कादंबरी यांचे लेखन केले
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी