“माझा हात खेचल्यामुळे…”;

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : रसिकांची लाडकी आर्ची अर्थात सैराट फेम रिंकू राजगुरू नुकतीच जळगावातील महासांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. या दरम्यान रिंकूला काही लोक भेटले ज्यामुळे थोडा गोंधळ झाला धक्काबुक्की झाली आणि रिंकू ह्यावर चिडली असून प्रेक्षकांना ओरडली अशी उपस्थित्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली. अशातच रिंकूने घडलेल्या घटनेबाबत खुलासा करून देण्यासाठी नुकतीच […]

“माझा हात खेचल्यामुळे…”;

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : रसिकांची लाडकी आर्ची अर्थात सैराट फेम रिंकू राजगुरू नुकतीच जळगावातील महासांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. या दरम्यान रिंकूला काही लोक भेटले ज्यामुळे थोडा गोंधळ झाला धक्काबुक्की झाली आणि रिंकू ह्यावर चिडली असून प्रेक्षकांना ओरडली अशी उपस्थित्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली. अशातच रिंकूने घडलेल्या घटनेबाबत खुलासा करून देण्यासाठी नुकतीच एक पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे.

“माझा हात खेचल्यामुळे…”;

रिंकूनं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहलं आहे, “जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत. मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा बातम्या प्रसारमाध्यमांवर पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमाठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका प्रतिनिधी सोबत मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती, तुमची रिंकू”. रिंकूच्या या पोस्टने अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जळगावच्या कार्यक्रमात रिंकूने प्रेक्षकांवर आरडाओरड केल्याची चर्चा होती. काहींनी ‘तुमच्या मुलीशी असे कृत्य केले तर तुम्ही ते सहन कराल का?’ असा सवालही केला. तथापि, रिंकूच्या नुकत्याच सोशल मीडिया पोस्टवरून हे स्पष्ट होते की ती जळगावच्या कार्यक्रमात चाहत्यांवर ओरडली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number