शाही थाटात होणार अनंत-राधिकाचे लग्न

जामनगर, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी शुक्रवार १ मार्च ते रविवार ३ मार्च दरम्यान तीन दिवसांचा विशेष सोहळा होणार आहे. हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातून मान्यवर येणार आहेत. लग्नाआधीचा सोहळा एवढा मोठा असल्यामुळे लग्न तर शाही थाटात […]

शाही थाटात होणार अनंत-राधिकाचे लग्न

जामनगर, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी शुक्रवार १ मार्च ते रविवार ३ मार्च दरम्यान तीन दिवसांचा विशेष सोहळा होणार आहे. हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातून मान्यवर येणार आहेत. लग्नाआधीचा सोहळा एवढा मोठा असल्यामुळे लग्न तर शाही थाटात होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबांकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जाणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्यासाठी बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेक उद्योगपती तसेच बॉलीवूडचे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. मिका सिंगने ईशा अंबानीच्या लग्नात दहा मिनिटांच्या कार्यक्रमासाठी दीड कोटी रुपये घेतले होते. आता अनंत अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी पॉप स्टार रिहाना ७४ कोटी रुपये घेणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number